पिंपरी चिंचवड न्यायालय स्थलांतराच्या कामाला वेग

0
पिंपरी : बरेच वर्षापासुन प्रलांभीत असणार्या पिंपरी न्यायालय सीनिअर डिव्हिजण व सेशेनकोर्ट चालु करण्यासाठी लागणारे फर्निचर करण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपा यांनी मंजुरी देऊन नवीन निविदा काढुन येत्या १५ दिवसामध्ये कामकाज चालु होणार आहे. कामकाज जुनपर्यंत संपवण्याचे सर्वातोपरी प्रयत्न देण्याच्ये आश्वासन पिं चिं मनपा आयुक्त राजेश पाटिल यांनी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन चे अध्यक्ष ॲड गोरखनाथ झोळ व कार्यकारणीला दिले आहेत.

मा.जिल्हा न्यायाधिश धोटे साहेब यांना पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन ने केलेल्या विनंती वरून फर्निचर आराखडा मान्य असल्याबद्दल दिलेल्या पत्रावरून पिं चिं मनपा असिस्टंट कमीशनर भुमी जिंदगी देशमुख साहेब यांनी दिलेल्या पत्रावरून एक्जिक्युटिव्ह इंजीनिअर संजय घुबे यांना पत्र दिलेले आहे. पत्रावरून त्यांनी व सिटी इंजिनिअर राजन पाटिल फर्निचर ची निविदा काढण्यासाठी २१ दिवसाचा कालावधी सांगितला होता, तर तो कमी करण्यासाठी आयुक्त राजेश पाटिल यांना नगरसेवक संदीप वाघेरे सह सर्व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार ची कार्यकारणी यांनी भेट देऊन कामकाजाबद्दल चर्चा केली. व कामकाज लवकरात लवकर पुर्ण करू असे आश्वासन आयुक्त राजेश पाटील यांनी दिले.

यावेळी उपस्थित पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन चे अध्यक्ष ॲड गोरखनाथ झोळ , उपाध्यक्ष ॲड पांडुरंग शिनगारे , सचिव ॲड महेश टेमगिरे , महिला सचिव मोनिका गाढवे, ॲाडिटर ॲड धनंजय कोकणे व ॲड प्रविण बोडके व ॲड मुकुंद ओव्हाळ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.