क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

एकाच वेळी तीन ठिकाणे कारवाई; 33 बुकी अटकेत, 45 लाखांचा ऐवज जप्त वाकड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात बेटिंग मोठ्या प्रमाणावर होते हे सर्वांना माहीत आहे. तरी देखील यावर कारवाई होत नव्हती. सध्या भारत आणि इंग्लड यांच्यात ‘वन-डे’ सामने सुरु आहेत. या सामन्यावर दुर्बिणीच्या सहाय्याने बेटिंग घेणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. 33 बुकींना पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी (26) रात्री ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड जवळील मामुर्डीगाव घोराडेश्वर डोंगर आणि विमान नगर पुणे या ठिकाणी वाकड पोलिसांनी छापा घालून 33 सट्टेबाजांना अटक केली. यावेळी पोलिसांनी 74 मोबाईल, तीन लॅपटॉप आणि एक लाख 26 हजार 430 रोख रक्कम आणि 28 हजारांचे परकीय चलन असा एकूण 44 लाख 87 हजार 730 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

अटक केलेले सट्टेबाज भारत आणि इंग्लंड दरम्यान गहुंजे मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या वन डे सामन्याचे घोराडेश्वर डोंगरावरून दुर्बिणीद्वारे निरीक्षण करून सामन्याची बॉल टू बॉल माहितीच्या आधारे काही लोक सट्टा घेत असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा घालून मध्यप्रदेश (४), हरियाणा (१३) महाराष्ट्र (11) राजस्थान (३) गोवा (१) आणि उत्तर प्रदेश (१) येथून बेटिंग साठी आलेल्या एकूण 33 जणांना अटक केली.

पोलिसांनी मामुर्डी गावातील एका इमारतीच्या छतावरून, घोराडेश्वर डोंगरावरून आणि चंदननगर येथून या आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी भोपाळमधील बुक्की भोलू नागपूर येथील बुक्की चेतन उर्फ सोनू यांच्या संपर्कात राहून त्यांना या सामन्याची माहिती देत होते. ऑनलाइन प्रक्षेपण आणि दुर्बिणीद्वारे सांगितलेले माहिती यामध्ये काही सेकंदाचा अंतर होते. त्याचाच गैरफायदा हे आरोपी घेत होते.

चिंचवड येथील शिवसेनेच्या माजी शाखा प्रमुखाचा खून झाला. यातील आरोपी पोलिसांनी पकडले. त्यावेळी हा खून बेटिंगच्या पैश्यातून झाल्याचे समोर आले. ही बाब पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना समजल्यानंतर ‘इसका मतलब शहर मे, बेटिंग चलता हे’ असे भर पत्रकार परिषदेत पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न केला होता. त्यावेळी त्यांनी बेटिंग वर कारवाईचे आदेश दिले होते.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक निरीक्षक अभिजीत जाधव उपनिरीक्षक दीपक कादबाने, हिंजवडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान कदम, वाकड पोलिस ठाण्याचे कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, राजेंद्र मारणे, विक्रम जगदाळे, बापूसाहेब धुमाळ, नितीन ढोरजे, दीपक भोसले विजय गंभीरे, विक्रम कुदळ अतिश जाधव, तात्यासाहेब शिंदे, सुरज सुतार, हेमंत डांगे, सागर सूर्यवंशी, श्याम बाबा, रवींद्र पवार, आकाश पांढरे, जनकसिंग गुमलड्डू अमर राणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.