शेतकरी व कामगार कायद्याच्या विरोधात काँग्रेसचे उपोषण

0
पिंपरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज राज्यभरात काँग्रेस पक्ष मुख्यालयात उपोषण करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने आज पुणे काँग्रेस भवन येथे उपोषण करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

मोदी सरकारने संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवत लादलेले कृषी कायदे व इंधन दरवाढी विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचा सक्रीय पाठिंबा आहे. तसेच आंदोलनावेळी या सरकारच करायचं काय; खाली डोक वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या.

या प्रसंगी माजी मंत्री मा. बसवराज पाटील, प्रदेश प्रवक्ते रत्नाकर महाजन, शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन साठे, माजी महिला प्रदेशाध्यक्ष श्यामला सोनवणे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल, सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष लक्ष्मण रुपणवर, अर्जुन खंडागळे, शहर युवक काँग्रेस सरचिटणीस चंद्रशेखर जाधव, कुंदन कसबे, गौरव चौधरी,विशाल कसबे, विवेक भाट,शहर काँग्रेसचे सुनील राऊत, हिरामण खवळे, सचिन नेटके, आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.