महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी योजना राबवितानाही वाकड , पिंपळे सौदागर , पिंपरी , भोसरी व प्राधिकरणाचा काही भाग धरून मतदान घेण्यात आले . व हा प्रोजेक्ट चिंचवड मतदारसंघात गेला . या प्रोजेक्टसाठी पिंपरीतून 32 हजार मतदान झाले . मात्र ते कधी घेण्यात आले हे कोणालाच माहीत नसल्याचा टोला नगरसेवक वाघेरे यांनी यावेळी लगावला . यावेळी ते म्हणाले की , 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजप पक्षाकडून मी निवडून आलो.
त्यावेळी महानगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत मी 13 विकासकामे मंजूर करण्याची मागणी केली होती . मात्र महापालिकेकडून पिंपरी ते काळेवाडी पर्यंतच्या 15 मीटर डिपी रस्ता विकसित करणे या एकाच कामाला मंजुरी देण्यात आली.व उर्वरित 12 कामे प्रभाग क्रमांक 21 असे नाव होते ती नाकारण्यात गेली . मागील चार वर्षांपासून पिंपरी प्रभाग २१ मधील कामासाठी मला सतत संघर्ष करावा लागला आहे. “महापालिका कोणाच्या बापाची जहागिरी नाही.” असा संताप व्यक्त केला.