अंदाजपत्रकीय बैठकीत 373 पैकी 137 उपसूचना नामंजूर

0
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आज दुपारी झालेल्या अंदाजपत्रकीय बैठकीत 137 उपसूचना नामंजूर करण्यात आल्या तर 236 उपसूचना मंजूर करण्यात आल्या असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती नितीन लांडगे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन 2021 ते 2022 साठीचे अंदाजपत्रक पालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केले.या अंदाजपत्रकामध्ये भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी व अपक्ष नगरसेवकांनी विविध प्रकारच्या 373 उपसूचना 26 मार्च रोजीच्या बैठकीत दिल्या.

या संदर्भात आज बुधवार दिनांक 31 रोजी विशेष बैठक बोलावण्यात आली. आणि याबैठकीत महापौर माई ढोरे यांनी उपस्थित 373 पैकी 137 उपसूचना नामंजूर करण्यात आल्या असून 236 सूचना मंजुर केल्याची माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.