परदेशात असलेल्या पतीला न्यायालयाने मंजूर केला अटकपूर्व जामीन

कौटुंबिक हिंसाचाराचा दावा

0

पुणे : पत्नीचा छळ करून तिला मानसिक त्रास देत फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या व सध्या परदेशात वास्तव्यास असलेल्या पतीला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश माधुरी देशपांडे यांनी हा आदेश दिला.

अभिजित विजय गोखले असे अटपूर्व जामीन मंजूर झालेल्या पतीचे नाव आहे. गोखले हे अमेरिकेतील एका कंपनीमध्ये काम करीत आहेत. २०१७ मध्ये पती आणि कुटुंबाविरूद्ध पत्नीने सिहंगड पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. पती आणि त्यांचे कुटुंबीय मानसिक छळ करीत असतं. कौटुंबिक वादानंतर ते घराबाहेर हाकलून देत. सोन्याचे दागिने पतीच्या नावावर करण्यासाठी मानसिक दबाव टाकला. बँकेतून पैसे काढण्याच्या स्लीपवर सासूने खोटी स्वाक्षरी करून माझ्या खात्यातून २० हजार रूपये काढले, अशी फिर्याद देण्यात आली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात अटकपूर्व

जामीन मिळण्यासाठी गोखले यांनी न्यायालयात अर्ज केला होता. गोखले व त्यांच्या कुटुंबीयांविरूद्ध केलेले आरोप किती चुकीचे आहेत. यातील कोणताही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही, असे अर्जदाराचे वकील ॲड. ह्रषीकेश सुभेदार यांनी न्यायालयास सांगितले. पत्नीलाच कोणतेही वैवाहिक नाते ठेवण्याची इच्छा नाही. त्यामुळे त्या घर सोडून गेल्या. अर्जदारांचे आईवडील हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांना २०१९ मध्ये जामीन मंजूर झाला आहे. तक्रार दाखल करायला उशीर झाला आहे, असा युक्तिवाद ॲड. सुभेदार यांनी केला. तर तक्रारदाराचे त्यांचे पत्नी आणि नातेवाईंकाबरोबर वादविवाद आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

गोखले यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय आता देश सोडून जाता येणार नाही. तसेच त्यांनी स्वत:च्या घराचा कायमस्वरूपी पत्ता तपास अधिकारी आणि न्यायलायाला दिल्याशिवाय तो बदलता येणार नाही, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

अर्जदाराला देखील समान न्याय मिळावा :
अर्जदारांच्या कुटुंबीयांना जामीन मिळाला आहे. त्याच धर्तीवर अर्जदाराला देखील समान न्याय मिळायला हवा. या दाव्यात सहआरोपी केलेल्यांविरूद्ध दोषारोपपत्र आधीच न्यायालयात दाखल झाले आहे. त्यामुळे आता त्यात काही बदल होणार नसल्याने पोलिस कोठडीतील तपासाची गरज नाही, असा युक्तीवाद अर्जदाराच्या वकिलांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.