अत्यावश्यक काम वगळता प्रशासकीय कार्यालयात येण्यास सर्वसामान्यांना बंदी

0
पिंपरी : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व पॉझीटीव्ह रुग्णांची झपाटयाने होणारी वाढ विचारात घेता महानगरपालिकेने नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत, विविध क्षेत्रीय कार्यालयांत, विभागीय कार्यालयात येणा-या नागरीकांना तसेच निर्वाचित सदस्य, पदाधिकारी वगळून अत्यावश्यक काम वगळता कार्यालयात येण्यास बंदी घातली आहे. तरी प्रत्यक्ष कार्यालयात न येता आपले म्हणणे, तक्रारी, सुचना या लेखी स्वरुपात ई-मेल व्दारे पाठवु शकता.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था , प्राथमिक व माध्यमिक शाळा , महाविद्यालये यांचे नियमित वर्ग तसेच खाजगी शिकवणी वर्ग दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत पूर्णतः बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील . इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षा असल्यामुळे त्यांना या मधून वगळण्यात येत आहे .

MPSC , UPSC चे कोचिंग क्लासेस आसन क्षमतेच्या ५० % क्षमतेनुसार सुरु राहतील. पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागु राहतील. अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.