तक्रारदार यांच्या विरुद्धच्या केसमध्ये त्यांच्या बाजून काम करून देते
न्यायदंडाधिकारी जतकर यांनी गायकवाड यांच्यातील संभाषण पोलिसांच्या हाती
या गुन्ह्यातील अटक आरोपी आणि अर्जदार यांच्यात मोबाईलवरून १४७ वेळा संभाषण झाले आहे. न्यायदंडाधिकारी जतकर यांच्या मोबाईल क्रमांकाचे डीसीआर पोलिसांना मिळाले आहे. त्याबाबत देखील पोलिस तपास करीत आहेत. जागेच्या वादासंदर्भात आणखी सात ते आठ लोकांना बाजूने निकाल लावून देण्यासाठी गायकवाड हीने संपर्क केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही सर्व प्रकरणे न्यायदंडाधिकारी जतकर यांच्या न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायदंडाधिकारी जतकर यांनी इतर आरोपींच्या मदतीने तक्रारदारांकडून काही रक्कम स्वीकारली आहे काय? याचा देखील पोलिस तपास करीत आहेत.
दरम्यान न्यायदंडाधिकारी जतकर यांनी या गुन्ह्यातील आरोपी भानुदास जाधव याला १८ तर सुशांत केंजळे याला चार वेळा कॉल केला आहे. न्यायदंडाधिकारी जतकर आणि इतर आरोपींनी यापूर्वी कट करून आणखी काही गुन्हे केले आहेत? यासंदर्भात तपास करायचा असल्याने त्यांना पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील विलास घोगरे-पाटील यांनी केला. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी आरोपीस पाच एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दुस-या सिमचा पोलिस घेताय शोध :
जतकर यांनी वापरलेले सीम हे मुंबर्इत राहणा-या समता कुबडे यांच्या नावाने आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना जतकर यांना दोन सिमकार्ड दिल्याचे पुढे आले आहे. मात्र जतकर यांच्याकडे एकच सिम मिळाले आहे. दुसरे सीम त्यांनी कोणाला दिले याचा पोलिस तपास करीत आहेत.