घरकुल लाभार्थ्यांना २८ एप्रिल पर्यंत कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत वाढ

0
पिंपरी : महानगरपालिकेच्या वतीने राबविणेत येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये निवड झालेले जे लाभार्थी कागदपत्र छाननीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत अशा रावेत प्रकल्पासाठीच्या लाभार्थ्यांना दि . ५ एप्रिल २०२१ ते ७ एप्रिल २०२१ पर्यत कागदपत्रे तपासणीकामी उपस्थित राहण्याचे नियोजन करणत आले आहे , अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे , उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले आणि सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके व आयुक्त राजेश पाटील यांनी दिली . तर रावेत प्रकल्पासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना उर्वरीत कागदपत्रे सादर करणेसाठी दि .२० एप्रिल २०२१ व दि .२२ एप्रिल २०२१ रोजी संधी देण्यात आली आहे .

बो-हाडेवाडी प्रकल्पासाठी निवड झालेल्या व जे लाभार्थी पहिल्या टप्प्यात उपस्थित शकले नाहीत त्यांच्यासाठी दि . ८ एप्रिल २०२१ , ९ एप्रिल २०२१ व दि .१२ एप्रिल २०२१ रोजी तपासणी करण्याचे नियोजन करणेत आले आहे . तर बो – हाडेवाडी प्रकल्पातील निवड झालेल्या व तपासणीतील उर्वरीत कागदपत्रे सादर करणेसाठी लाभार्थ्यांनी २३ एप्रिल २०२१ व दि .२६ एप्रिल २०२१ रोजी उपस्थित रहावे . च-होली प्रकल्पातील निवड झालेल्या परंतु कागदपत्रांच्या छाननीसाठी उपस्थित न राहिलेल्या लाभार्थ्यांना १५ एप्रिल २०२१. १६ एप्रिल २०२१ व दि .१९ एप्रिल २०२१ रोजी कागदपत्रे छाननीसाठी उपस्थित राहता येणार आहे .

तर यापूर्वि कागदपत्रे तपासणी झालेल्या मात्र उर्वरीत कागदपत्रे सादर न केलेल्यांना दि . २७ एप्रिल २०२१ व दि .२८ एप्रिल २०२१ रोजी आपली कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. ही माहिती महापौर उपा उर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी दिली . यासाठी लाभार्थ्यांनी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग , चिंचवड याठिकाणी आपली कागदपत्रे छाननी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.