गोरगरिब रुग्णांना अल्पदरात प्लाझ्मा उपलब्ध करून द्या : भाजप युवा मोर्चाची मागणी

0
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढत आहे . महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या दवाखान्यांवर ताण येत असून नाईलाजाने नागरिकांना खासगी हॉस्पटलमध्ये उपचार घ्यावा लागत आहे .

अशावेळी रूग्णांना वाचविण्यासाठी प्लाझ्माची प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे . प्लाझ्मा या लढ्याचं प्रमुख शस्त्र मानलं जात आहे . त्याचा वापर करुन कोरोनाग्रस्त व्यक्तींना बरे करता येणे शक्य आहे . परंतु आता प्लाझ्माची कमतरता जाणवत आहे . अश्यावेळी लोकांचा कल हा महानगरपलिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रक्तपेढीकडे जास्ती आहे . कोरोनाच्या काळात आर्थिक दृष्ट्या फटका बसलेल्या लोकांकडे राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार ६ हजार रुपये भरावे लागत आहे .

गोरगरिब रुग्णांना परवडणारा नसून सदर बाबतीत आयुक्तांनी लक्ष घालून पूर्वी प्रमाणे ४०० रुपयांत प्लाझ्मा उपलब्ध करून द्यावा , अशी विनंती आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आली . महापालिका प्रशासनाने असा निर्णय घेतल्यास कोरोनाच्या विरोधातील लढा अधिक बळकट करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरेल अशी भावना युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली .

यावेळी महापौर माई ढोरे , संकेत चोंधे , दिनेश यादव , शिवराज लांडगे , उदय गायकवाड , पूजा आल्हाट , प्रकाश चौधरी , विक्रांत गंगावणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.