कंपन्यातील कर्मचाऱ्यांना ने-आण करणाऱ्या वाहनांना ‘संचारबंदी’तून वगळले

0
पिंपरी : शहरात आजपासून 9 एप्रिलपर्यंत निर्बंध कडक करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत. महापालिका क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक सेवा वगळता सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मात्र, यामधून जीवनाश्यक वस्तूंचा (दूध, भाजीपाला, फळे) पुरवठा करणारे, वृत्तपत्र सेवा, अत्यावश्यक सेवा पुरवणारे आस्थापना, व्यक्तींना, कोरोना लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना, त्यांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. ज्या उद्योगांचे शिफ्टमध्ये कामकाज चालते. अशा संबंधित आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना व त्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांनाही वगळण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार, मॉल, हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेते, हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील. मॉल आणि सिनेमा हॉल, धार्मिक स्थळं, पीएमपीएमल बससेवा 7 दिवस बंद राहणार आहेत.  केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. आठवडे बाजारही बंद राहणार आहेत. लग्न आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत. व्यायामशाळा, जिम बंद राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.