पुणे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आज शनिवार पासून पुणे जिल्ह्यात सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यामुळे सायंकाळी पाच नंतर रस्त्यावर घरी जाण्यासाठी कामगार वर्गाची मोठी गर्दी दिसत होते. प्रशासन आस्थापना बंद करण्यासाठी प्रयत्न करत होते.
संध्याकाळी 6 ते सकाळी 6 दरम्यान पुणे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज पहिला दिवस असल्याने पोलिसांनी बरोबर सहा वाजता मार्केट मध्ये जाऊन दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.
पिंपरी चिंचवड परिसरात ठिक-ठिकाणी नाकाबंदी करुन कारवाई सुरु केली आहे.
संध्याकाळी 6 वाजता पिंपरी चिंचवड मधील सर्वात मोठी असणारी पिंपरी बाजारपेठ बंद झाली.
पालकमंत्री, विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशांचे कडक अंमलबजावणी.
पुण्यातील बाबूगेनू चौकात संचारबंदीची अमलबजावणी सुरू केल्यानंतर आज संध्याकाळी सहा वाजता नियमाचे पालन करत विक्रत्यांनी सर्व दुकाने बंद केली