पुणे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आज शनिवार पासून पुणे जिल्ह्यात सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यामुळे पोलीस प्रशासन नागरिकांना आवाहन करत आहे.
पुण्यातील बाबूगेनू चौकात संचारबंदीची अमलबजावणी सुरू केल्यानंतर आज संध्याकाळी सहा वाजता नियमाचे पालन करत विक्रत्यांनी सर्व दुकाने बंद केली.