दररोज २५ हजार नागरिकांना लसीकरण…

0
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात मिशन २५ हजार कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून सुपर स्प्रेडर्स सह वय वर्षे ४५ व त्यावरील नागरिकांनी आज दि .५ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत कोविड लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे . मिशन २५ हजार कोविड लसीकरण उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आयुक्त पाटील यांनी महापालिकेच्या फेसबुक वरुन नागरिकांशी थेट संवाद साधला . पुणे जिल्हयात १ लाख कोविड लसीकरण करण्याचे उद्दिष्ट शासनाने समोर ठेवले आहे .

त्यातील २५ हजार लसीकरणाच्या उद्दीष्टपुर्ती साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे असे नमुद करुन आयुक्त पाटील म्हणाले , जगभरात कोविड लसीकरणामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढल्याचे दिसून आले आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत . आरोग्याच्या सुरक्षितेसाठी कोविड १ ९ प्रतिबंधात्मक लसीकरण महत्वाचे ठरले आहे . भारत सरकारने सुरु केलेल्या लसीकरण मोहिमेध्ये आपण सहभागी आहोत . प्रतिदिन २५ हजार नागरिकांचे लसीकरण करता येऊ शकेल एवढी लसीकरण केंद्रे महानगरपालिकेने सुरु केलेली आहेत .

अत्यावश्यक सेवेतील अधिक व्यक्तींशी विविध कामानिमित्त संपर्कात येणा – या सुपर स्प्रेडर्सना प्राधान्याने लसीकरण मोहिमेअंतर्गत कोविड १ ९ लस देण्याचे प्रयोजन आहे . यामध्ये दुकानदार , भाजी विक्रेते , वाहनचालक , एस . टी . आणि पी.एम.पी.एम.एल. मध्ये काम करणारे कर्मचारी , सुरक्षा रक्षक , शिक्षक , आरोग्य सेवा देणा – या व्यक्ती आदींचा समावेश आहे . या सर्वांनी नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले . झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी देखील महानगरपालिकेने व्यवस्था केली आहे . लसीकरण केंद्र दूर असल्यास नागरिकांना त्या केंद्रापर्यंत ने – आण करण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे . लोकप्रतिनिधी , विविध सेवाभावी संघटना , सामाजिक व राजकिय कार्यकर्त्यांनी या मोहिमेध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपल्या घरातील आणि परिसरात असणा – या ४५ वर्ष वयावरील तसेच लसीकरणासाठी पात्र असणा – या व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहीत करुन त्यांचे लसीकरण करुन घ्यावे .

तसेच त्यांना आवश्यक सहकार्य देखील करावे असे आयुक्त पाटील म्हणाले . शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय यंत्रणेवर परिणाम होणे साहजिक आहे . त्यामुळे प्रत्येकाने कोरोना विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन स्वत : च्या आरोग्याची काळजी घ्यावी .

होम आयसोलेशन मध्ये असणारे काही कोरोना बाधित रुग्ण नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास येत असून असे रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे या रुग्णांनी नियमांचे काटेकोर पालन करावे . होम आयसोलेशन मध्ये असणा – या कोरोना बाधिताने नियमांचे पालन न केल्यास अशा व्यक्तींची माहिती तात्काळ महापालिकेला देण्यात यावी . नियमांचे उल्लंघन करणा – या अशा व्यक्तींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल असे आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने योग्य पध्दतीने मास्कचा वापर , फिजीकल डिस्टसिंग चे पालन , आणि सॅनिटायझेशन या नियमांचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक आहे . कोरोनाची लक्षणे जाणवल्यास वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन त्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

कोविड १ ९ प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रत्येकाने सहभाग आणि सहकार्य करुन मोहिम यशस्वी करावी असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले . दरम्यान , विविध सेवाभावी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत काल महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये बैठक घेण्यात आली . अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे , महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे यांनी या प्रतिनिधींशी संवाद साधून कोविड लसीकरण मोहिम यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

pune
Leave A Reply

Your email address will not be published.