यावेळी ज्येष्ठ रिक्षाचालक संजय गजरे यांनी सुनिता गजरे पत्नीसोबत लसीकरण करून घेतले, तसेच रवींद्र लंके, सुरज सोनवणे यांनीसुद्धा लसीकरण करून घेतले, याबद्दल उल्हास जगताप आणि कुंदन गायकवाड यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, यावेळी उल्हास जगताप म्हणाले पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोणा वाढत आहे, यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी लसीकरण करणे आवश्यक आहे, यामध्ये शहरातील विविध संस्था संघटनांनी पुढे येऊन नागरिकांना शहरातील लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्याचे आव्हान करावे, यामध्ये रिक्षावाले असेन इतरही घटक असतील त्यांनी लसीकरण करून घेतल्यास आपले जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होईल,
यावेळी बाबा कांबळे म्हणाले रिक्षाचालकांचा नागरिकांशी थेट संबंध येतो यामुळे रिक्षाचालकांना स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या सुरक्षासाठी, स्वतःचे लसीकरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, यामुळे शहरातील सर्व रिक्षा चालक मालकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या कुटुंबासह लसीकरण करून घ्यावे असे आवाहन बाबा कांबळे यांनी यावेळी केले, यावेळी कुंदन गायकवाड म्हणाले शहरातील हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब घटकांना मोफत लसीकरण उपलब्ध करून देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घेतला असून या उपक्रमांमध्ये सर्व विविध घटकांनी सहभागी होऊन लसीकरणाचा लाभ घ्यावा.