पुणे : कोरोना व्हायरसचा प्रादुभाव शहरात झपाट्याने वाढत आहे. पुण्यातील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. त्याबाबत राज्य शासनाकडून आदेश काढण्यात आले आहेत. उद्यापासून पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळून) 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत.
शहरातील सर्व दुकाने, मार्केट आणि मॉल हे संपुर्ण दिवस बंद राहणार आहेत. (अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू वगळून)
अ) जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडी राहतील पण सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागले.
ब) जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांच्या मालकांनी आणि कामगारांनी लवकरात लवकर कोविड-19 ची लस घ्यावी. ग्राहकांसोबत सोशल अंतर बाळगूनच बोलावे तसेच दुकान मालक आणि कामगारांनी फेसशिल्डचा वापर करावा.
क) बंद असलेल्या सर्व दुकान मालकांनी त्यांच्यासोबत असणार्या कामगारांचे कोविड-19 लसीकरण करावे.