अनिल देशमुख जाणार सर्वोच्च न्यायालयात

0

मुंबई : आयपीएस परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या चौकशीचे आदेश सीबीआयला दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.  या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. तसेच, न्यायालयाने १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचाही आदेश सीबीआयला दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनी देखील याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत.

तर, आता याप्रकरणी अनिल देशमुख हे स्वतंत्रपणे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं समोर येत आहे. एकूणच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात लवकरच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.