पुण्या पाठोपाठ पिंपरी-चिंचवड मध्येही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद : आयुक्त

0

पिंपरी : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण याबाबतचे सुधारित आदेश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केलेत. शहरातील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

महापालिका आयुक्तांचे सुधारित आदेश खालील प्रमाणे..

● १. कलम १४४ आणि रात्री संचारबंदी लाग करणे.

a. पिंपरी चिंचवड संपुर्ण कार्यक्षेत्रासाठी कलम १४४ लागू करणेत येत आहे.

b. सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७:०० ते संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करणेत येत आहे.

c. या व्यतिरीक्त (सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ०६:०० ते सकाळी ०७:०० व शुक्रवार संध्याकाळी ०६:०० ते सोमवार सकाळी ०७:०० वाजेपर्यंत) खाली दिलेल्या वैध कारणां शिवाय किंवा वैध परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी सर्व व्यक्तींना मनाई करणेत येत आहे.

d. वैद्यकीय आणि इतर जीवनावश्यक सेवांना सूट देण्यात आलेली असुन त्यांचे वाहतुकीला निबंध असणार नाहीत.

■ e. खालील सेवांचा अंतर्भाव जीवनावश्यक सेवा म्हणुन करणेत येत आहे.

i. रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाना, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा.
ii. किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळे विक्रेते, दुग्धालये, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने
i. सार्वजनिक वाहतुक – रेल्वे, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बस,
iv. विविध देशांच्या राजदूत कार्यालयाशी संबंधित सेवा
v. पिंपरी चिंचवड महागरपालिकेचे मान्सून पूर्व उपक्रम
vi. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवा
vii. वस्तुंची वाहतुक vi. शेती विषयक कामे
ix. ई-कॉमर्स सेवा
x. मान्यताप्राप्त माध्यम सेवा
xi. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत अत्यावश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या सेवा
xii. माहिती तंत्रज्ञान विषयक अत्यावश्यक सेवा (जास्तीत जास्त २०% कर्मचारी संख्येने सर्व्हर देखभाल दुरुस्ती सारख्या अति महत्वाच्या सेवा चालविण्यात याव्यात. बाकी सर्व काम धरुनच करण्याविषयी (work from home) संबंधित कंपनीच्या मनुष्यबळ अधिका-याने खबरदारी घ्यावी.)
xii, पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने
xiv. सर्व कुरीअर / कार्गो सेवा
xv. डेटा सेटर्स, क्लाउड सर्व्हिसेस सबंधी सेवा ।
xvi, पायाभूत सुविधा आणि महत्वाच्या सेवांना आधार देणारी आयटी सेवा.
xvii. सरकारी व खाजगी सुरक्षा यंत्रणा

f. खालील खाजगी संस्थांना भारत सरकारच्या निकषानुसार कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्याचे लवकरात लवकर लसीकरण करणेत येईल. या अटीवर कार्यालय आठवड्याचे सर्व दिवस सकाळी ०७:०० ते संध्याकाळी ०६:०० वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी असेल. सर्व कर्मचारी यांनी भारत सरकाचे निकषांनुसार लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे व त्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे. तसेच ज्या व्यक्तींचे लसीकरण झालेले नाही त्यांचेकडे १५ दिवसांसाठी ग्राह्य असलेले आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक आल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील, सदरचा नियम दिनांक १० एप्रिल २०२१ पासून लागू राहील, जर वरीलपैकी कोणीत्याही व्यक्तीजवळ नकारात्मक आरटीपीसीआर प्रमाणपत्र न मिळाल्यास/लसीकरण न केलेले आढळल्यास त्यास रक्कम रुपये १०००/- दंड आकारुन वसुल केला जाईल,

i. सेबी आणि सेबीची कार्यालये, स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि सेबी नोंदणीकृत मध्यस्थ यासारख्या बाजाराच्या पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या संस्थां.
ii. आरबीआय द्वार चालविल्या जाणाऱ्या संस्था, स्टैंडअलोन प्राइमरी डीलर्ससह मध्यस्थ, CCIL, NPCL, payment system operators, आर्थिक बाजार, बाजारामध्ये भाग घेणारे आरबीआय मार्फत नियमित सहभागी.
iii. सर्व नॉन-बँकिंग वित्तीय कॉर्पोरेशन / संस्था
iv. सर्व मायक्रो फायनान्स संस्था
v. वकिलांची कार्यालये
vi. कस्टम हाऊस एजंट्स, लस / जीवनरक्षक औषधे / फार्मास्युटिकल उत्पादनांच्या वाहतुकीशी संबंधित परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर

g. आठवड्याचे सर्व दिवस वैध तिकीटाच्या आधारे विमानतळ / ट्रेन / बस / येथ जाणाऱ्या व तेथुन येणाऱ्या व्यक्तीस परवानगी असेल.

h. कंपनी ओळखपत्राचे आधारे संध्याकाळी ०६:०० ते सकाळी ०७:०० वाजेपर्यंत तसेच शनिवार व रविवार या दिवशी खाजगी बस अथवा वाहनाने प्रवास करणारे औद्योगीक क्षेत्रातील कामगारांना परवानगी राहील.

i. धार्मिक स्थळे / उपासनेची ठिकाणे पुर्णत: नागरिकांसाठी बंद आहेत. परंतु तेथे कामकाज करणाऱ्या व्यक्तींना तेथे कामकाज करणेची मुभा राहील, धार्मिक स्थळी कोणतेही लग्न / अंतिम संस्कार होणार असल्यास, ४ एप्रिल २०२१ च्या शासकीय आदेशानुसार विवाहसोहळा / अंतिम संस्कारांच्या संदर्भात दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून फक्त त्याच उद्देशास परवानगी देण्यात येईल.

j. वैध प्रवेश पत्राचे आधारे कोणत्याही परीक्षेस जाणाऱ्या व परीक्षेवरुन येणाऱ्या व्यक्तीला संध्याकाळी ०६:०० नंतर परवानगी राहील.

k. शनिवार व रविवार या दिवशी असणाऱ्या पुर्वनियोजीत लग्न समारंभाचे बाबतीत ४ एप्रिल २०२१ च्या शासकीय आदेशानुसार विवाहसोहळा संदर्भात दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून ज्या त्या प्रभाग क्षेत्रिय कार्यालयाने व संबधीत पोलिस स्टेशनने त्या वेळची कोविड – १९ बाबतची परिस्थीती पाहून परवानगी देण्याची कार्यवाही करावी.

२. सार्वजनिक ठिकाणे

a. आठवड्यातील सर्व दिवशी सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने, क्रिडांगणे बंद राहतील.

३. दुकाने, बाजारपेठा व मॉल

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा आणि मॉल्स दिवसभर बंद राहतील.

a. अत्यावश्यक दुकानाचे परिसरात ग्राहकांमधील सामाजिक अंतर राखणे बंधनकारक राहील. दुकानाचे परिसरात ग्राहकांमध्ये पुरेसे सामाजिक अंतर राखण्यासाठी चिन्हांकित खुणा करून त्याठिकाणी ग्राहकांना थांबवावे.

b. भारत सरकारचे निकषांनुसार जीवनावश्यक वस्तू दुकानांचे मालक आणि सर्व दुकानांवर काम करणान्या व्यक्तींनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

C. सर्व दुकानदारांनी पारदर्शक काचेचे किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट इत्यादीद्वारे ग्राहकांशी संवाद साधण्यासारख्या सुरक्षा उपायांचे पालन करावे. जेणेकरुन कोविड १९ च्या प्रसाराची कोणतीही भीती न बाळगता सर्व दुकाने पुन्हा सुरू करणे शक्य होईल

Leave A Reply

Your email address will not be published.