उद्योगनगरीत ‘कॉर्पोरेट लसीकरण’ मोहिमेसाठी ‘ कोविड- १९ हेल्पडेक्स’

४५ वयापुढील कामगारांना कंपनीतच होणार लसीकरण

0

पिंपरी : ‘कामगारनगरी’ अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक कंपन्यांमधील कामगारांसाठी कंपनीतच महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कोविड- १९ लसीकरण केंद्र कार्यान्वयीत करण्यात येणार आहे. त्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात ‘कोविड- १९ हेल्पडेक्स’ सुरू करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासनाकडून कोरोना लसीकरण केले जात आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांनीही पुढाकार घ्यावा. कंपनीत कोविड- १९ लसीकरण केंद्र कार्यान्वयीत करण्यासाठी संबंधित कंपनींच्या मनुष्य संसाधन विभागाने ‘कोविड-१९ हेल्पडेक्स’ला संपर्क करावा. त्याद्वारे कंपनीत लसीकरण केंद्र कार्यान्वयीत करण्याबाबत सर्वोतोपरी कार्यवाही करण्यात येईल, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

शहरातील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. बहुसंख्य कंपन्यांमध्ये कामगारांसाठी मेडिकल युनिट कार्यान्वयीत आहे. त्याठिकाणी योग्य व्यवस्था केल्यास ४५ वर्षे वय व त्यापुढील कामगारांना कोविड-१० लसीकरण करता येवू शकते. परिणामी, लसीकरणाची संख्याही वाढणार आहे. त्यासाठी कंपन्यांनी सकारात्मक पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.

कार्पोरेट कंपन्यांसाठी ‘कोविड-१९ हेल्पडेक्स’
आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने कार्पोरेट कंपन्यांसाठी कोविड-१९ लसीकरण केंद्र कार्यान्वयीत करण्याबाबत हेल्पडेक्स सुरू केला आहे. 7057001010 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. तसेच, [email protected] या मेल आयडीवर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.