राज्यात पुन्हा तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता

0

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी मिनी लॉकडाऊन करण्यात आले आहे, आज संध्याकाळ पासून सोमवार सकाळ पर्यत कडक लॉकडाऊन आहे. असे असले तरी कोरोनाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. वाढत्या प्रकोपामुळं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. याबाबत आज मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते आणि सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली आहे.

लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन आवश्यक आहे. आज मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत हाच मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला असून येणाऱ्या तीन-चार दिवसात त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल, असं वडेट्टीवार म्हणाले.

तीन आठवड्यांचा हा लॉकडाउन कडक स्वरूपाचा असायला हवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनच्या या कालावधीत फक्त भाजी आणि अत्यावश्यक सेवासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा द्यावी अशी मागणीही केली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवार यांनी सांगितलं की, अकरा तारखेला होणारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढील निर्णयापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पुढे परीक्षा केव्हा होईल याची तारीख नंतर सांगण्यात येईल. तसेच महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डासह केंद्र सरकार विविध परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी केंद्र सरकारकडे महाराष्ट्रकडून केली जाणार आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.