खराब रस्त्याचा प्रवास बेतला जीवावर

0

पिंपरी : खराब रस्त्याने टेम्पो मधून प्रवास करत असताना एका मुलीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 2) दुपारी पावणेतीनवाजताच्या सुमारास रसिक वाडी ते भुजबळ वस्ती रोड जांभे येथे घडली.

आयाज रजाक शेख (40, रा. काटे वस्ती, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक एकनाथ शंकर कुसाळकर (35, रा. जांबे, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वीट भट्टीवर आरोपी एकनाथ हा टेम्पो चालक म्हणून काम करतो. रहदारीचा रस्ताखराब असताना त्याने टेम्पोमध्ये त्याची मुलगी, मुलगा आणि एका लहान मुलीला बसवले. खराब रस्त्याने प्रवास करत असताना हादरेबसून टेम्पोमधील एका मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.