तळेगाव : किशोर आवारे आणि मी एकत्र राजकारणात काम केले आहे. आमच्यात मतभेद होते मात्र मनभेद नव्हते. काहीजण याघटनांचे राजकारण करत असून, राजकीय आकसातून माझ्यावर आणि माझ्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचंआमदार सुनिल शेळके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्ये प्रकरणी आमदार शेळके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. त्यासंदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी आमदार शेळके यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
किशोर आवारे यांच्या हत्येची शुक्रवारी घडलेली घटना ही निंदनीय असून या सर्वांच्या मागे कोण आहे हे समोर येणे गरजेचे आहे असेमत आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केले. जनतेने मला त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार केले आहे, कोणाच्या जीवावर उठण्यासाठी नाही.
कोणाच्या जीवावर उठण्यापेक्षा मी राजकारणातून बाहेर होईल अशा शब्दात आमदार सुनिल शेळके यांनी संताप व्यक्त करत पोलीसयंत्रणेला संपुर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. आमची राजकीय बदनामी करण्याचे काम सुरु आहे, असे घाणरडे राजकारणकोणी करु नये. राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मावळ तालुक्यातील परिस्थिती त्यांना सांगणार असल्याचेआमदार शेळके यांनी सांगितले.