‘सिद्धीविनायक’ ग्रुपचे राजेश साकला आणि वृषभ साकला यांच्यावर गुन्हा दाखल

0

पुणे : महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्टनुसार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सदस्यांची सोसायटी स्थापन करुन त्याचे हस्तांतरण सोसायटीकडे करणे बंधनकारक असतानाही तब्बल 12 वर्षे  हस्तांतरण न केल्याने सिद्धीविनायक प्रॉपर्टीच्या भागीदारांविरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सिद्धीविनायक प्रॉपर्टीचे भागीदार राजेश कुमार नवपतलाल साकला (70, रा. कॅम्प) आणि वृषभ राजेश साकला (41) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बाबुराव धायगुडे (७४, रा. सनश्री एमरॉल्ड सोसायटी, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन भादंवि कलम IPC 406, 409 सह महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट कलम 11, 13 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांधकाम व्यावसायिकाने प्रकल्प पूर्ण केल्यानंतर प्रकल्पातील सदस्यांची सोसायटीची स्थापना करायची असते. प्रकल्पातील जमीन, इमारतीचे सोसायटीकडे हस्तांतरण करावयाचे असते. कायद्यानुसार बांधकाम व्यावसायिकाने हे करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सिद्धीविनायक प्रॉपर्टीने कोंढवा खुर्द स. नं. 22 येथे मे 2008 मध्ये प्रकल्प पूर्ण केला. त्यानंतर सोसायटीची स्थापनाही केली.

मात्र, त्यानंतर प्रकल्पातील जमीन, इमारतीचे सोसायटीकडे हस्तातंरण केले नाही. सोसायटीने अनेक वेळा विनंती करुन देखील तब्बल 12 वर्षे हस्तांतरण न केल्याने शेवटी सोसायटीच्या वतीने बाबुराव धायगुडे यांनी फिर्याद दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.