वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल घेतल्याप्रकरणी प्रकल्प प्रमुखासह तिघांवर गुन्हा दाखल

0

यवत : पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस (ता. दौंड) येथील टोलनाक्यावर वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसूल केल्याप्रकरणी प्रकल्प प्रमुखासह तीन जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे

मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही टोल आकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकार आहे.

पाटस टोल नाक्यावरील प्रकल्प प्रमुखासह अजित सिंग ठाकूर यांच्या सह तीन जणांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्त वाहिनीने दाखवीले. तेव्हा ही वरून सूत्रे हालली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.