गजा मारणे याच्यावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणूक काढल्यानंतर गजनान मारणे याच्यावर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. खालापूर टोल नाक्यावर गोंधळ घालत तेथील कर्मचाऱ्यांना टोल न घेण्यासाठी दमदाटी केल्या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी किरण मोरे (36) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गजनान मारणे व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन मारणे व त्याचे साथीदार 30 ते 40 गाड्यामधून पुण्यात जात होते.

यावेळी खालापूर टोलनाक्यावर त्यातील 9 ते 10 जण खाली उतरले. त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवत फिर्यादी व त्याठिकाणी टोल घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत गजानन मारणे कोण आहे, तुम्हाला माहिती आहे का, ते गाडीत आहेत. ते आजच तळोजा कारागृहातून बाहेर आले असून घरी जात आहेत. आमच्या कोणत्याही गाडीकडून टोल घ्यायचा नाही, अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, अशी दमबाजी केली असल्याचे म्हंटले आहे. तपास खालापूर पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.