देवाच्या मूर्तीवरील नोटा काढून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

पिंपरी :  मंदिरातील देवाच्या मूर्तीवरील समोरील नोटा कोणत्याही परवानगीशिवाय काढून घेतल्याप्रकरणी तिघांवर आळंदीपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 7 ऑक्टोबर 2022 ते 5 मे 2023 या कालावधीत कोयाळी येथीलश्री भानोबा देव मंदिरात घडली आहे.

याप्रकरणी बाळकृष्ण तात्याबा कोळेकर (53, रा कोयाळी चाकण) यांनी सोमवारी (दि.24) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीआहे.

फिर्यादीवरून बबन महादू कोळेकर (60), सिताराम महादू कोळेकर (65), दत्तात्रय विठोबा कोळेकर (60 ) सर्व राहणार कोयाळीयांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मागील वर्षभरात कोणाच्याही परवानगीशिवाय श्री भानोबा देवाच्या समोरील अंगावरीलपन्नास शंभर रुपयांच्या एकूण 2 हजार 700 रुपयांच्या नोटा घेतल्या आहेत. हे करत असताना त्यांनी कोणाचीही परवानगी घेतलीनाही. यावरून तिघांवर चोरीचा गुन्हा दाखल केला असून आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.