पिंपरी : सराईत गुन्हेगार निलेश घायवळ व अन्य दोघांच्या शुभेच्छांचा फलक लावल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.
सराईत गुन्हेगार निलेश घायवळ व अन्य दोघांचे फलक लावल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत चांदणी चौकात पाइपलाइन हायवे रोड लगत निलेश घायवळ याचे तसेच इतर दोघांचे वाढदिवसानिमीत्तअनधिकृत फलक लावण्यात आले होते. हिंजवडी पोलीस आणि पुणे महापालिका बावधन क्षेत्रीय कार्यालय यांच्या पथकाने संयुक्तकारवाई करून हे अनधिकृत फलक काढून टाकले आहेत.
निलेशभाऊ घायवळ युथ फाउंडेशनचे सदस्य व अन्य दोघांवर अनधिकृत फलक लावल्याप्रकरणी कोथरूड बावधन क्षेत्रियकार्यालययाचे परवाना निरीक्षक निलेश काळुराम घोलप यांनी फिर्याद दिली आहे़. हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.