पिंपरी : महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल मे. स्पर्श हॉस्पिटलचे डॉ. अमोल होळकुंदे व संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा – युवक काँग्रेसची मागणी
एकही रुग्ण नसताना महापालिकेस कोट्यावधीची बिले सादर करणाऱ्या डॉ.अमोल हळकुंदे व यामध्ये सामील असलेले महापालिकेचे अधिकारी यांनी महापालिकेची आर्थिक फसवणुक केली असून यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे पत्र पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. मिलिंद वाघमारे यांना देण्यात आले. या विषयाची पूर्ण माहिती सांगितल्यानंतर श्री. वाघमारे साहेब यांनी चौकशी करू व दोषी आढळल्यास कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.
या प्रसंगी सेवादलचे अध्यक्ष मकरधवज यादव, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे सरचिटणीस कुंदन कसबे, विशाल कसबे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस विवेक भाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले होती. त्यामध्ये अनेक खाजगी हॉस्पिटलला कोविड सेंटर सुरू करण्याबाबत महापालिकेने निर्देश दिले होते ,याच पार्श्वभूमीवर सध्या महापालिकेच्या वतीने कोविड सेंटरची बिले अदा करण्याचे काम सुरू आहे यामध्ये “स्पर्श मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल” यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेला एकाही रुग्णांवर उपचार न करता तसेच महानगरपालिकेची अटी व शर्ती त्याची पूर्तता न करता यांनी ५ कोटी २६ लाखाची बिले सादर केली आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने महापालिकेचे कोट्यावधी रुपये लाटण्याचे उद्दिष्टाने ही बिले सादर करण्यात आली आहेत.
एकही रुग्ण नसताना महापालिकेस कोट्यावधीची बिले सादर करणाऱ्या डॉ.अमोल हळकुंदे व यामध्ये सामील असलेले महापालिकेचे अधिकारी यांनी महापालिकेची आर्थिक फसवणुकीच्या उद्दिष्टांनी ही बिले सादर केलेली आहेत त्यामुळे स्पर्श हॉस्पिटल चे डॉ. अमोल हळकुंदे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात येते आहे.