‘त्या’ बिल्डरवर होणार गुन्हा दाखल, महापालिकेने पोलिसांकडे दिला तक्रार अर्ज

0

पिंपरी : पिंपळे सौदागर येथे झालेल्या रस्ता खचण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधातगुन्हा दाखल करणार आहे. महापालिका आयुक्तांनी स्वतः या प्रकरण लक्ष घातल्याने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी सांगवीपोलिस ठाण्यात एक तक्रार अर्ज दिला आहे. त्यानुसार, पोलिस संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करणार आहेत.

पिंपळे सौदागर येथे बांधकाम व्यावसायिकाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे गुरुवारी महापालिकेचा १५ फूट रस्ता खचला. एकाबांधकाम व्यावसायिकाच्या चुकीमुळे एवढी मोठी दुर्घटना घडली असताना देखील महापालिकेच्या बांधकाम विभागातील काहीअधिकारी या बांधकाम व्यावसायिकाला पाठीशी घालत असल्याचे दिसून आले. एवढी मोठी घटना घडल्यानंतर या अधिकाऱ्यांनी फक्तकाम बंद ठेवण्याची नोटीस या बिल्डरला पाठविली आहे. या नोटिसमध्ये बिल्डरने केलेल्या निकृष्ट कामामुळे रस्ता खचला, असाउल्लेखही करण्यात आलेला नाही. याबाबत बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता, नोटीस दिली आहे, भरपाईघेत आहोत, असेच उत्तर देण्यात आले. मात्र, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. आयुक्त सिंह यांनीबांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना सूचना देत, झालेल्या प्रकारा बाबत सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करायला लावलाआहे.

महापालिका कोणालाही पाठीशी घालणार नाही. ज्यांची चूक आहे, ज्यांच्यामुळे एवढी मोठी घटना घडली त्यांच्यावर कारवाई होणारआहे. सध्या रस्ता दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करून देणे, हे जास्त महत्वाचे वाटल्याने प्राधान्याने ते काम केले. या प्रकरणात कसागुन्हा दाखल करण्यात येईल, या बाबत पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे. त्यानुसार महापालिकेने सांगवी पोलिस ठाण्यात एकतक्रार अर्ज दिला आहे.

शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

गुन्हा कोणावर दाखल होणार ?

महापालिकेने बांधकाम व्यावसायिक घनशाम सुखवाणी आणि संजय रामचंदानी यांच्या नावाने नोटीस काढली आहे. मात्र, महापालिकेनेपोलिस ठाण्यात कोणाच्या विरोधात अर्ज केला आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे महापालिकेच्या तक्रारीवरुन मुख्य बांधकामव्यावसायिकांवर गुन्हा दाखल होणार की नेहमी प्रमाणे एखाद्या सुपरवयाझरवर गुन्हा दाखल होणार, हा मोठा प्रश्न आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.