पिंपरी : जमीन खरेदी,विक्री करणाऱ्या व्यावसायिकाच्या हत्येचा कट पिंपरी– चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दरोडा विरोधीपथकाने उधळून लावला आहे. याप्रकरणी सुपारी देणाऱ्या मित्रासह तीन जणांना दरोडा विरोधी अटक केली. यात एका महिलेचादेखील समावेश आहे.
व्यावसायिक राजू माळी यांच्या हत्येसाठी मित्र विवेक लाहोटी याने सुधीर परदेशी याला पन्नास लाख रुपयांची महिलेमार्फत सुपारीदिल्याचं समोर आल आहे. आरोपीकडून ३ पिस्तुल आणि ४० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुधीर परदेशी याला नुकतच मावळ मधील सोमाटणे फाटा येथून दोन गावठी पिस्तूलआणि १६ जिवंत काढतुसासह ताब्यात घेतलं होतं. याप्रकरणी त्याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला होता. त्याचा अधिकचा तपास दरोडा विरोधी पथक करत होत.
तपासामध्ये सुधीर परदेशी याने त्याचा साथीदार शरद साळवी यांच्यामार्फत मध्य प्रदेशातून तीन गावठी पिस्तूल आणि ४० जिवंतकाडतुसे आणली होती. पैकी, एक पिस्तूल आणि २४ जिवंत काडतुसे हे चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या विवेक लाहोटी यांना देण्यातआले होते. त्यांना पिंपरी– चिंचवडमधून दरोडा विरोधी पथकाने अटक केली.
विवेक लाहोटी हे जमीन खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय करतात यात त्यांचा मित्र राजू माळी हा भागीदार होता. परंतु, राजू माळीयांच्यासोबत झालेल्या व्यवहारातील गैरसमजुतीतुन लाहोटी यांनी सुधीर परदेशी यास ५० लाख रुपयांची सुपारी देऊन राजू माळीयांची हत्या करण्याचा कट रचला होता.