पिंपरी : एकाच गाडीतून आलेल्या मित्रांनी एका मित्रावर भरदिवसा, वर्दळीच्या ठिकाणी गोळ्या झाडून खून केला. ही घटना बुधवारी (दि. 23) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रक्षक चौकात घडली.
सागर शिंदे (रा. जुनी सांगवी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सागर याच्यावर गंभीर गुन्हा दाखल आहे. काही वेळातच मुख्य आरोपी योगेश जगताप याला गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सागर शिंदे आणि आरोपी एकाच स्विफ्ट कारमधून रक्षक चौकात आले. गाडीतच त्यांचा वाद झाला. आरोपींनी पिस्तुलातून सागर यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात सागर यांचा मृत्यू झाला. हा प्रकार भारत इलेक्ट्रिक कंपनीसमोर प्रकारघडला.
गोळीबार झाल्यानंतर आरोपी गाडीतून खाली उतरले. त्यांनी बीआरटी मार्गातून दुसऱ्या बाजूला जाऊन एका वाहन चालकाला अडवले. त्याचे वाहन जबरदस्तीने घेऊन पळ काढला.
सागर याच्यावर सन 2013 मध्ये चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच वादातून हा प्रकार घडला असल्याचे म्हटलेजात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे पोलीस, वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. सीसीटीव्ही फुटेजतपासून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. हा प्रकार कोणत्या कारणातून झाला आहे, हे मात्र समजू शकले नाही.