पिंपरी : सिमेंटच्या गट्टूने डोक्यात घाव घालून तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना मोशी मधील बोऱ्हाडेवाडी येथे शुक्रवारी (दि. 10) रात्री घडली. या गुन्ह्यातील आरोपीला पिंपरी–चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने 12 तासात अटक केली. त्याच्या पत्नीलाशिवी दिल्याच्या रागातून त्याने तरुणाचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
संदीप उर्फ सेंडी दशरथ देशमाने (25, रा. केशवनगर, कासारवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. केतन निवृत्ती कोंढाळकर(28, रा. पिंपरी वाघेरे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस हवालदार संदीप मांडवी यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरीपोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोऱ्हाडेवाडी येथे एक अनोळखी मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. केतन कोंढाळकर याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा समांतर तपास गुंडा विरोधी पथकाने केला. गुंडा विरोधी पथकाने केतन याचा मोबाईल प्राप्त करून त्याचे तांत्रिक विश्लेषणकेले. खून होण्याच्या आदल्या दिवशी त्याच्या संपर्कातील लोकांकडे पोलिसांनी चौकशी सुरु केली. त्यावेळी खुनाच्या रात्री केतन याचामित्र संदीप देशमाने हा त्याच्यासोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
संदीप याच्या राहत्या घरी पोलीस दाखल झाले. मात्र तो घरी मिळून आला नाही. गुंडा विरोधी पथकातील मयूर दळवी, सुनील चौधरी, शुभम कदम, शाम बाबा, गणेश मेदगे यांनी संदीपचा ठावठिकाणा शोधला. तो त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी थेरगाव येथे येणारअसल्याने पोलिसांनी सापळा लाऊन संदीप याला ताब्यात घेतले.
संदीप आणि केतन हे मित्र होते. केतन याने संदीप याच्या पत्नीला शिवी दिली होती. त्या कारणावरून संदीपने केतन याचा सिमेंटच्यागट्टूने मारून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. खुनाची घटना घडल्यानंतर अवघ्या 12 तासात गुंडा विरोधी पथकाने आरोपीलाअटक केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायकपोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक अशोकजगताप, हजरत पठाण, पोलीस अंमलदार प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, विजयगंभिरे, सुनील चौधरी, मयूर दळवी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, शुभम कदम, रामदास मोहिते, ज्ञानेश्वर गिरी, तौसीफशेख, तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली.