माथाडी कामगारच्या नावाखाली लूटमार करणाऱ्या टोळीला अटक

0

पिंपरी : माथाडीच्या नावाखाली व्यावसायिक व कामगारांत दहशत माजवून आर्थिक लुटमार करणाऱ्या टाेळीला जेरबंद करण्यात वाकड पाेलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पाेलिसांनी रमाकांत राजेंद्र जाेगदंड (वय-30,रा.वाकड,पुणे), समीर नझीर शेख (33,रा.काळेवाडी,पुणे), मयुर बाळासाहेब सराेदे (23,रा.पुनावळे,पुणे) व करण सदाफळ चव्हाण (24,रा.पुनावळे, पुणे) यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील माऊली चाैकातील स्टार बाझारपुढे 5 जुलै राेजी तक्रारदार अनिकेत रविंद्र वाडीया (वय-24,रा.शिवाजीनगर,पुणे) यांचे मालकीचे रेजीम व्हिस्टा फॅसिलीटीस सर्व्हिसेस प्रा.लि.चे असिस्टंट मार्केटिंग एक्झीक्युटीव्ह सुर्यकांत वाघमारे व राेहन कांबळे हे प्रमाेशनल अॅक्टिव्हिटी करत हाेते. त्यावेळी त्याठिकाणी पांढऱ्या रंगाच्या फाॅर्च्युनर गाडीतून आराेपी जाेगदंड व त्यांच्यासाेबत आणखी दाेन ते तीन जण आले. त्यांनी तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्यांना मी माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे. माझ्या परवानगीशिवाय येथे कामगार कसे काय ठेवले? काम कसे काय करत आहात? असे बाेलून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आराेपींनी तक्रारदार यांच्या हातातील टायटनचे घडयाळ व साेन्याची अंगठी जबरदस्तीने काढून नेली. यावेळी झालेल्या मारहाणीत त्यांच्या डाेक्याला, ताेंडाला , पाेटाला, कंबरेला व पायाला मार लागला. त्यामुळे त्यांनी त्याची वाकड पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार वरिेष्ठ पाेलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी तपास पथकातील सपाेनि संताेष पाटील, पाेउपनि सचिन चव्हाण यांनी आराेपी वेगवेगळे पथके तयार करुन आराेपींचा शाेध सुरु केला. त्यानुसार सदर आराेपींना वाशी, नवी मुंबई येथे जावून सापळा रचून अटक केली.

चौकशीत जाेगदंडने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर त्याच्या सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली. आराेपी रमाकांत जाेगदंड (वय-30) हा सराईत गुन्हेगार असून ताे माथाडी ट्रान्सपाेर्ट सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियनचा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आहे.

दुसरीकडे, गत 4 जुलै राेजी माथाडी संघटनेचा सचिव सुरेश बनसाेडे (वय-37,रा.रहाटणी,पुणे) याने काळेवाडी परिसरात ज्याेतीबानगर येथे 3 ट्रक चालकांकडे प्रत्येकी 10 हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच दहडपशाही करुन ट्रकच्या आरशाचा काचा फाेडून नुकसानही केले. याप्रकरणी सागर मारनुर (वय-25,रा.अभिसेवाडी, ता.सांगाेला, साेलापूर) यांनी तक्रार दिल्यानंतर पाेलिसांनी आराेपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. माथाडी संघटनेच्या नावाखाली कुणी खंडणी मागितली तर तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल करा, असे आवाहन पाेलिस उपायुक्त डाॅ. काकासाहेब डाेळे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.