रिक्षांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याची धिंड

0

पिंपरी : वाकड परिसरात 13 रिक्षांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी तपासाच्या नावाखाली अक्षरशः धिंड काढली आहे. ज्या परिसरात दहशत माजवत होते, त्याच परिसरात त्यांची धिंड काढण्यात आली.

तोडफोड प्रकरणात मुख्य आरोपी सुरक्षा रक्षक किरण घाडगेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सागर घाडगे, चंद्रकांत गायकवाड, मयूर अडागळे, अविनाश नलावडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हातोबा नगर वाकड येथे 13 रिक्षांची तोडफोड करणाऱ्या किरण घाडगेसह पाच जणांची वाकड पोलिसांनी त्याच परिसरात धिंड काढली आहे. संबंधित आरोपींना धडा शिकवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी धिंड काढली असल्याचं वाकड पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.