तळेगावमध्ये टोळक्याचा राडा; दोघांवर कोयत्याने वार

0

पिंपरी : मंडळाची विसर्जन मिरवणूक चांगली केली म्हणून विरोधी गटाने दोघांना मारहाण करत कोयत्याने वार केले.हा प्रकार तळेगावातील भेगडे आळी येथे शुक्रवारी (दि.9) मध्य रात्री साडेबारा वाजता घडला.पोलिसांनी यातील तीन आरोपींना अटक केली आहे.

याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात शुभम नरसिंग आडके (वय 22 रा.तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली असून श्रेयश उर्फ बंटी अनिल किरवे (वय 24), विजय उर्फ किरण विकास भालेराव (वय 22),दिपक लालमण शिगणे (वय18) यांना पोलिसांनी अटक केली असून कुमाल ठाकूर,वैभव अवचरे, कुणाल दुबे, धिरज गरूड, अथर्व शिंदे,किरण (पुर्ण नाव माहिती नाही) व आणखी आट ते दहा जण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व त्यांचा मित्र अक्षय प्रकाश गायकवाड हे त्यांच्या मोरया मित्रमंडळ येथे मिरवणूकीनंतर बसले होते.यावेळी कुमाल ठाकूर व त्याच्या टोळीला फिर्यादी यांनी गणेश विसर्जनाचा कार्यक्रम चांगला पार पाडला याचा व जुन्या भांडणाचा राग होता.याच कारणावरून कुणाल व त्याच्या आठ ते दहा साथीदारांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला मारहाण करत दोघांवर जीवघेणा असा कोयत्याने वार केला.याप्रकरणी आरोपीवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.