पिंपरी : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी चोरून बीड मधील नातेवाईकांना गिफ्ट करणाऱ्या भामट्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी चोरट्याकडून तेरा दुचाकी हस्तगत केल्या असून 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकड पोलीस ठाण्यातील कर्मचारी वंदू गिरे, राजेंद्र काळे, बाबाजाण इनामदार, विभीषण कन्हेरकर हे वाकड हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना काळाखडक येथे एक जण दुचाकीकडे वारंवार पाहत असून गाड्यांचे हँडल लॉक तपासत होता हे पाहता पेट्रोलिंग टीम ला त्याच्यावर संशय आल्याने कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कडे चौकशी केली. त्याने आपले नाव शुभम बजरंग काळे (22, रा. बीड) असे सांगितले. पोलिसांच्या पुढील तपासात त्याने पुणे व पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले पोलीस तपासात आरोपीचे दहा गुन्हे उघडकीस आले असून तेरा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
सदर तपास पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त श्रीकांत दिसले, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर,पोलीस निरीक्षक (गुन्हे )संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस अंमलदार विभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, बापू धुमाळ, नितीन ढोरजे, जावेद पठाण,विजय गंभीरे,विक्रम कुदळ, वंदू गिरे ,प्रमोद कदम, अतिश जाधव ,नितीन गेंगजे, प्रशांत गिलबिले, श्याम बाबा ,कल्पेश पाटील ,तात्या शिंदे, कौंनतेय खराडे या पथकाने केली आहे.