निरोगी ज्येष्ठत्व हीच खरी देशाच्याअमृत महोत्सवाची भेट : सागर कवडे

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघ ,लोकमान्य हॉस्पिटल आणि जेरीयाट्रिक वेलनेस फाउंडेशन संघाच्या वतीने भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

या आनंद मेळाव्याचे उद्घाटन पिंपरी चिंचवड पोलीस सहायक आयुक्त सागर कवडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले .ज्येष्ठ नागरिक महासंघ,लोकमान्य हाॅस्पिटल व जेरियॅट्रीक वेलनेस फौडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा व फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ यावेळी घेण्यात आला. लोकमान्य हॉस्पिटलचे सीईओ मोहन नायर, सीईओ अशोक सेन, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष  हरीभाउ बागडे, कार्याध्यक्ष वैशाली मरळ यावेळी उपस्थित होत्या.

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याविषयी जनजागृतीसाठी “लोकमान्य आरोग्य संवाद “या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉ.आशीष सूर्यवंशी ,डॉ. भूषण गणवीर, फुट अँड अँकल स्पेशालिस्ट डॉ. श्याम ठक्कर, मूत्रविकार तज्ञ डॉ. सुनील पालवे, कॅन्सरतज्ञ डॉक्टर पंकज क्षीरसागर आणि हृदयरोग तज्ञ डॉक्टर मंगेश कुलकर्णी यांनी जेष्ठांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उकल करुन दृकश्राव्य माध्यमाद्वारे  समाधान केले. यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत मीनल जोशी, नीता खरे यांना उत्तेजनार्थ, शिवशंकर गुजुल यांना गाडगेबाबा यांच्या वेशभूषेला तर किशोर पाठक यांच्या टिळक वेशभूषेला तर रमेश इंगळे यांच्या  वासुदेव या वेशभूषेला प्रथम क्रमांक मिळाला .निबंध स्पर्धेत मेधा कालिदास जोशी, प्रमोद येवलेकर व रमाकांत तुंगारे यांना प्रथम ,द्वितीय, तृतीय क्रमांक मिळाले. यां स्पर्धैचे परीक्षण सुहास जोशी व रंगकर्मी जुवेटकर यांनी केले .

ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह नि ऊर्जा तरुणांना लाजवणारीआहे. त्यांचे निरोगीपण हीच खरी अमृत महोत्सवाची भेट आहे. आरोग्यसंपन्न ज्येष्ठत्व यासाठी लोकमान्य आरोग्य संवादासारखा जनजागृतीचा कार्यक्रम आवश्यक आहे. अशा कार्यक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य हे निरामय होणे शक्य होईल. निरोगी ज्येष्ठ हे देशाच्या सांस्कृतिक वैचारिक सामाजिक कार्यात भरीव योगदान देतील .हा आरोग्य नि सांस्कृतिक यांचा सुंदर मिलाफ असलेला आनंद मेळावा आहे असे डॉक्टर सागर कवडे म्हणाले. कार्यक्रमाच्या आयोजनात रूपाली पाण्डु साने यांनी बहुमोल सहकार्य केले. डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.