बोनस व इतर मागण्यांसाठी सफाई कामगार महिला पुरुषांचे मनापासून आंदोलन
बोनस न मिळाल्यास महापालिकेसमोर दिवाळी करू : बाबा कांबळे
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ईमाने इतबारे सेवा देणारे सफाई कर्मचारी आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत आहेत स्मार्ट सिटी असा टेंभा मिरवणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी ही शरमेची बाब आहे सणासुदीच्या काळात सफाई कर्मचाऱ्यांना बोनस त्यांचे वेतन न मिळाल्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रवेशद्वारासमोरच काळी दिवाळी साजरी करून महापालिका प्रशासनाचा निषेध करणार असल्याचा इशारा कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला.
कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने साफसफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर आंदोलन केले. या वेळी बाबा कांबळे बोलत होते.
या वेळी घरकाम महिला साभा अध्यक्ष अशा कांबळे,कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, सरचिटणीस मधुरा डांगे, उपाध्यक्ष अनिल गाडे, सुषमा बाळसराफ, टपरी, पथारी, हातगाडी पंचायत शहराध्यक्ष रमेश शिंदे सरचिटणीस प्रकाश यशवांते, आदी या वेळी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने साफसफाई काम करणाऱ्या कामगारांना,समान काम समान वेतन मिळावे, दिवाळीत बोनस मिळावा,कमावरू कमी करू नये, कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे, टाईम कामगाराप्रमाणे सर्व सुविधा मिळाव्यात, यासह विविध मागण्यां
आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेत शिष्टमंडळाने चर्चा केली, मागण्या पूर्ण न झाल्यास महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा या वेळी देण्यात आला.