तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर एआयएडीएमकेने दिलेल्या शब्दानुसार जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही आघाडी तोडत असल्याचे डीएमडीकेने म्हटले आहे. राज्यातील सत्ताधारी असलेल्या एआयएडीएमकेने आपला सहकारी पक्ष असलेल्या भाजपाला 234 पैकी 20 जागा देण्याची घोषणा केली होती. तर आघाडीतील अन्य मित्रपक्ष असलेल्या पीएमकेला 23 जागा दिल्या आहेत.
दरम्यान एआयएडीएमकेने सहा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर डीएमडीकेने एनडीएला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली. जयललिता यांच्या निधनानंतर सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरा जाणार आहे. दरम्यान यंदा अभिनेते कमल हसन यांचा पक्ष असलेला एमकेएम पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर असदुद्दीन ओवेसांचा एआयएमआयएम पक्ष टीटीव्ही दिनाकरन यांच्या अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम पक्षासोबत आघाडी केली आहे. तामिळनाडूमध्ये विधानसभेसाठी 6 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल हा 2 मे रोजी लागणार आहे.