मशिनगनसह मोठा शस्त्रसाठा जप्त!, सराईत गुन्हेगार अटकेत

0

ठाणे : ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पळसनेर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे येथे एका सराईत गुन्हेगारास अटक करून त्याच्याकडूनमोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

सुरजीतसिंग उर्फ माजा आवसिंग (२७, रा. मु.उमर्टीगाव पो.बलवाडी ता. वरला जि. बडवानी,मध्यप्रदेश) असे या सराईताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून २० गावठी पिस्तुले, एक मशिनगन, मॅग्झीनसह २८० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

वागळे इस्टेट पोलिसांना हा आरोपी हवा होता. मात्र, तो हाती लागत नव्हता. तो १० जुलै रोजी पळसनेर येथे शस्त्रविक्रीसाठी येणारअसल्याची माहिती गुन्हे शाखा घटक चे वरिष्ठ निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली. त्यानंतर ठाणे गुन्हेशाखा घटक चे पथकतातडीने पळसनेर येथे जाऊन पोहोचले. त्यांनी शिताफ़ीने आरोपीला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मोठाशस्त्रसाठा सापडला. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १८ जुलैपर्यंत पोलीसकोठडी दिलीआहे.

हा मोठा शस्त्रसाठा कोणास आणि कोणत्या कारणासाठी विकला जाणार होता याचा तपास सुरू आहे.

ही कारवाई वागळे युनिट ठाणेचे वरिष्ठ  निरीक्षक विकास घोडके, सहायक निरीक्षक भूषण शिंदे, अविनाश महाजन,उपनिरीक्षकसुनिल अहिरे, हवालदार संदिप शिंदे,  रोहीदास रावते,  सुनिल निकम, शशिकांत नागपुरे,  विजय पाटील,  माधव वाघचौरे,  सुनिलरावते,  विजय काटकर, अजय साबळे, सुनिता गिते,  मिनाक्षी मोहिते, नाईक उत्तम शेळके,  तेजस ठाणेकर, शिपाई यश यादव आदींनीकेली.

Leave A Reply

Your email address will not be published.