पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आज मोठी दुर्घटना टळली. रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या 10 टन टँकचा सेफ्टी वॉल लिकेज झाल्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती झाली.
सुदैवाने रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महानगरपालिकेचे रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टँकमध्ये ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम सुरू होते. त्याच दरम्यान प्रेशर जास्त झाल्याने टाकीचा सेफ्टी वॉल लिक झाल्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती सुरू झाली.
सुदैवाने अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. या वायसीएम रुग्णालयात एकूण 800 बेड्स आहेत. सध्यस्थितीत रुग्णालयात एकूण 406 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.