पुण्यातील ‘त्या’ आत्महत्या प्रकरणामुळे महाविकास आघाडीतील एक मंत्री अडचणीत?

0

पुणे : हडपसर येथे सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणीने आत्महत्या केली. ही एक आत्महत्या की हत्या आहे याचा तपास करावा; या तरुणीचे महाविकास आघाडी सरकार मधील एका मंत्र्याशी प्रेम संबंध असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे याची चौकशी व्हावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने केली आहे.

पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा ने रविवारी आत्महत्या केली. तरुणीने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही; परंतु संबंधित तरुणीच्या आत्महत्येवरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. संबंधित बड्या मंत्र्याचा या तरुणीसोबत असलेला संबंध पोलिसांनी शोधून काढला पाहिजे.

या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित दोषी गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी करत भाजपा महिला आघाडीने तशी तक्रार दाखल केल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना याबाबतचे निवेदनही दिले आहे.

ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल
पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी ज्या मंत्र्याचा संबंध जोडला जात आहे, त्याच्या काही कथित ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्या आहेत. त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना करीत असल्याचा संवाद आहे.
कोणत्याही परिस्थितीत लॅपटॉप, मोबाइल ताब्यात घे हे प्रकरण वाढता कामा नये, अशा सूचना त्या संवादात आहेत. या कथित ऑडिओ क्लिप बाहेर कशा आल्या याविषयी देखील उलटसुलट चर्चा आहे. या प्रकरणात आपण अडचणीत येऊ, असे लक्षात आल्याने काही व्यक्तींनी मुद्दाम संवाद रेकॉर्ड करून ठेवले, असे म्हटले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.