इंग्लड मधून आलेल्या चौंघामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला

0

पुणे : इंग्लंड मधून अहमदाबादला आलेल्या प्रवाशांपैकी चार जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यांच्यामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला असल्यानं एकच खळबळ उडाली असून प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे.

इंग्लंडहून 23 डिसेंबरला 175 प्रवासी अहमदाबादला आले होते. त्यापैकी चार रुग्णांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे, असा खुलासा पुण्यातील वायरोलॉजी रिपोर्टमधून करण्यात आला आहे. अद्याप 6 रुग्णांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली आहे.

भारतामध्ये नवा कोरोना झपाट्याने पसरत आहे, 30 डिसेंबर पर्यंत 20 रुग्णांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं होतं. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचा (New Covid -19 strain) आता भारतात देखील झपाट्याने पसरू लागला आहे. ब्रिटनमधून भारतात परतलेल्या नागरिकांपैकी 20 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या 20 रुग्णांपैकी 8 रुग्ण हे दिल्लीतील आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.