मुंबई : गेल्या २४ तासांमध्ये १,३६१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या १३१ दिवसांमधील हि सर्वाधिक लोकसंख्या आहे. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई शहरात कोरोनाचा उद्रेक आटोक्यात न आल्यास लवकरच मुंबईत अंशत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
रविवारी राज्यात एका दिवसात ११ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रविवारचा रुग्णसंख्येचा आकडा गेल्या १३१ दिवसांमध्ये सर्वाधिक आकडा आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोरोना रुग्ण वाढीची माहिती देण्यात आली. तसेच या बैठकीत अंशत: लॉकडाऊन बाबतही चर्चा करण्यात आली आहे.
राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या १ लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. यामध्ये एकट्या मुंबईमध्ये ९ हजार ३१९ सक्रीय रुग्ण आहेत. लवकरच हा आकडा देखील १० हजारांचा टप्पा ओलांडेल. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे तसेच रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे एप्रिल महिन्यापर्यंत सक्रीय रुग्णांचा आकडा २ लाखांपर्यंत पोहोचेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.