शाळेतील लिफ्टच्या दारात अडकून शिक्षिकेचा मृत्यू

0

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील मालाड येथील एका शाळेत 16 सप्टेंबर रोजी एका महिला शिक्षिकेचा लिफ्टच्या दारातअडकून मृत्यू झाला. शिक्षिका शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून सहाव्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये शिरली होती. तेवढ्यातलिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट वरच्या दिशेने जाऊ लागली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. शाळेतीलकर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी शिक्षेकेला मृत घोषित केले.

हे प्रकरण मुंबईतील मालाड येथील चिंचोली बंदर येथील सेंट मेरी इंग्लिश हायस्कूलचे आहे. जेनेल फर्नांडिस असे अपघातात मृत्यूझालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे वय 26 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. दुपारी .४५ च्या सुमारास ही घटना घडली. जेनेललाशाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून सहाव्या मजल्यावरील स्टाफ रूममध्ये जायचे होते. ती लिफ्टची वाट पाहत होती, लिफ्ट येताच ती आतशिरू लागली.

जेनेल नुकतीच लिफ्टमध्ये प्रवेश करत होती, तेवढ्यात लिफ्टचा दरवाजा बंद झाला. त्यामुळे जेनेलचे अर्धे शरीर लिफ्टच्या आत तरउर्वरित लिफ्टच्या बाहेर होते. लिफ्टच्या दारात शिक्षक अडकल्याचे पाहून शाळेचे बाकीचे कर्मचारी त्यांच्या मदतीसाठी धावले, मात्रतोपर्यंत लिफ्ट तिसऱ्या मजल्याकडे जाऊ लागली. सुमारे अर्धा तास जेनेल लिफ्टच्या दारात अडकून पडल्याचे घटनास्थळी उपस्थितलोकांचे म्हणणे आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कसेतरी शिक्षेकेला लिफ्टमधून बाहेर काढून लाईफलाइन हॉस्पिटलमध्ये नेले. येथेडॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.