हिंजवडी परिसरातून वाहन चोरी करून ग्रामीण भागात विक्री करणारा चोरटा गजाआड

0

पिंपरी : शहरी भागातून वाहनांची चोरी करून परभणी सारख्या ग्रामीण भागात विक्री करणाऱ्या एका सराईत चोरट्याला हिंजवडीपोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 15 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या चोरट्याने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीनेशेतकऱ्यांना कमी किमतीत दुचाकी विकल्याचे निष्पन्न झाले आहे.

रवि परमेश्वर धांडगे (23, रा. पाथरगव्हाण ता. पाथरी, जि. परभणी), विकास उद्धव धांडगे (पाथरगव्हाण ता. पाथरी, जि. परभणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जुलै रोजी हिंजवडी येथील एका कंपनी समोरून भर दिवसादुचाकी चोरीला गेली. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना एकच चोरटा हिंजवडी परिसरात वारंवार वाहन चोरी करतअसल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी हिंजवडी ते सुपा अहमदनगर या मार्गावरील तब्बल 350 सीसीटीव्ही फुटेजची पाहणीकेली. त्यातून आरोपीचे नाव निष्पन्न करत पोलिसांनी रवी धांडगे याला अटक केली.

आरोपी रवी परभणी जिल्ह्यातून अधून मधून हिंजवडी येथील पांडवनगर परिसरात राहण्यासाठी येत असे. हिंजवडी परिसरात राहून तोदुचाकी चोरी करून गावाकडे घेऊन जात. तिथे विकास उद्धव धांडगे याला चोरीची वाहने विकत असे. विकास हा गावातील शेतकऱ्यांनाविश्वासात घेऊन गाडीची कागदपत्रे दोन दिवसात आणून देतो असे खोटे सांगून त्यांना दुचाकी विकत असे. विकास याच्याकडून 15 तररवी याच्याकडून तीन दुचाकी अशा एकूण पाच लाख 40 हजार रुपये किमतीच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

ही कामगीरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. वसंत परदेशी, पोलीसउप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षकसुनिल दहिफळे, सोन्याबापु देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडूमारणे, बापु घुमाळ, बाळकृष्ण शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे. रितेश कोळी, अरुण नरळे, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, नरेशबलसाने, अमर राणे, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, दत्तात्रय शिंदे, सागर पंडीत यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.