खंडाळा घाटात भिषण अपघात; 4 ठार; 8 जखमी

0

लोणावळा  : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात आज पहाटे सहा वाहनांचा भिषण अपघात झाला आहे. या अपघातात एका कारचा दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये चेंदामेंदा झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर वाहनांमधील 3 जण गंभीर तर 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

दोन कंटेनर, दोन कार, टेम्पो व ट्रक अशा सहा वाहनांचा हा अपघात आहे. सर्व वाहने मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे.

घटनेची माहिती समजताच आयआरबी, देवदूत यंत्रणा, लोकमान्यची यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्थेचे पथक, बोरघाट व खोपोली पोलीस यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेत मयत व जखमी यांना वाहनांमधून बाहेर काढले.


सर्व वाहने बाजुला काढल्याने वाहतूक पुर्वपदावर येत आहे. मात्र अपघात झाल्यानंतर काही काळ वाहतूककोंडी झाली होती.


अतिशय भिषण व वेदनादायी असा अपघात झाला असून यामध्ये दोन्ही कारचा चेंदामेंदा झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.