पुनावळे, पुणे येथे रंगला एका ग्रूपचा अनोखा ‘गेटटुगेदर’

0

पिंपरी: आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाने जग जवळ येत असताना माणसं दूर जात आहेत.आणि अशातच माणसाची संवादाची भूक जिथे भागेल असा सोशल मिडिया जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. फेसबुकवर आभासी वाटणारं हे जग वास्तवातही इतकी सुंदर अनुभूती देऊ शकतं असा प्रत्यय देणारं एक स्नेहसंमेलन नुकतंच पार पडलं. एक असा सुंदर समूह असावा ज्यात सगळ्यांना आपल्याच कुटुंबात वावरत असल्याचा अनुभव येईल.

जिथे नीतिमूल्ये असतील तरीही खेळकरपणा असेल या भावनेतून तयार झालेला समूह म्हणजे ‘We, The Bond’.जीनल सुर्वे-फडतरे यांच्या संकल्पनेतून सुहास देशमुख पेडगावकर यांच्या सक्रिय पाठिंब्याने तसेच दत्तानाना गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली,उभ्या राहिलेल्या या समूहाचे ८ जानेवारी ला पहिले स्नेहसंमेलन पार पडले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जवळजवळ पावणेदोनशे लोकांनी ह्या सोहळ्यात सहभाग घेतला आणि एका स्वर्गीय सुखाचा याची देही याची डोळा सुखानुभव घेतला. संपूर्ण दिवसातील क्षण न क्षण हा आनंदाने भारलेला होता. तन मन प्रफुल्लित करणारा,माणसं जोडणारा हा आनंदसोहळा होता.

या समूहाचे हे तिन्ही एडमिन, मॉडरेटर आणि अनेक लोकांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मेहनतीचा परिपाक म्हणजे हे यशस्वी झालेलं स्नेहसंमेलन होतं. यामधे ऍडमिन जीनल अणि त्यांच्या टीमचे योग्य नियोजनबद्ध रीतीने केलेले काम प्रत्येक गोष्टी  मध्ये दिसून आले. काही सामाजिक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून हा समूह वाटचाल करत आहे. यासाठी गरज असते चांगल्या माणसांना एकत्र आणण्याची, त्यांना जोडण्याची आणि हे स्नेहसंमेलन ही त्याचीच पायाभरणी होती. या स्नेहसंमेलनात वी द बॉन्ड ग्रुप ची पुणे, पिंपरी चिंचवड़, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण सह राज्यातील विविध जिल्ह्यातुन २००हुन अधिक सभासद सहभागी झाले होते. या निमित्ताने अनेक सभासदांच्या विविध कला गुणांचे दर्शन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.