हिंजवडी : आयटी पार्क हिंजवडीतील गोदरेज २४ या उच्चभ्रु सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येत विविध मागण्यांसाठी बिल्डरच्याविरोधात शनिवारी (ता. ६) दुपारी साडे बारा वाजता अनोखे आंदोलन केले.
बिल्डरच्या सुरू असलेल्या दुसऱ्या प्रकल्पावर जाऊन फसवणूकीबाबत ग्राहकात जनजागृती अन बिल्डरची मोठी बदनामी केली. येथीलगोदरेज २४ या सुमारे दीड हजार सदनिका असलेल्या च्या सोसायटी रहिवाशांना बिल्डरने घर घेताना अनेक दिवा स्वप्ने दाखवली. अँमिनिटीजची पूर्तता केलीच नाही या शिवाय ज्या मूलभूत आणि अत्यावश्यक सेवा आहेत त्याही पुरविल्या नाहीत.
पिण्याचे पाण्याची सुविधा नाही, दुकाने, स्कुल, गेट नाही एसटीपी प्लांट काम करत नाही. अग्निशमन केंद्राच्या समोर अनधिकृत पार्किंगकेली आहे आशा विविध समस्येसाठी ते बिल्डरकडे पाठपुरावा करूनही वर्षभरापासून बिल्डर टाळाटाळ करत असल्याने बिल्डरचे तोंडउघडण्यासाठी सोसायटी रहिवाशांनी अनोखी शक्कल लढवत आज आंदोलन केले.
ज्या बिल्डरने त्यांचा प्रकल्प उभारला आहे त्या बिल्डरची म्हाळुंगे हद्दीत मुळानदी काठी रिव्हर साईड टू नावाच्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. शनिवारी–रविवारी येथे ग्राहक फ्लॅट पाहण्यासाठी येतात याचाच फायदा घेत शनिवारी हे सर्व रहिवाशी रिव्हर टूप्रकल्पावर पोहचले हातात फलक घेऊन,विविध मागण्यांसाठी बिल्डरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आम्ही फसलो तुम्हीफसू नका अशी घोषणाबाजी करत तेथे येणाऱ्या प्रत्येल ग्राहकाला झालेल्या फसवणुकीची माहिती देणारे पत्रक वाटण्यात आले.