‘संबंध’ बिघडल्यावर महिला पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही : सुप्रीम कोर्ट

0

नवी दिल्ली : पुरुषासोबत राहणारी महिला संबंध बिघडल्यावर पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही. असा मोठा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. जर एखाद्या महिलेचे कोणत्या पुरुषासोबत संबंध असतील आणि ती स्वत:च्या इच्छेने त्याच्यासोबत राहत असेल, त्यानंतर त्यांचे संबंध बिघडल्यावर महिला बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही. असं न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात निरीक्षण नोंदवताना न्यायाधीश हेमंत गुप्ता आणि न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने आरोपीचा अटकपूर्व जामीन गुरुवारी मंजूर केला. दरम्यान, ‘तक्रारदार महिलेचे अपीलकर्ता पुरुषासोबत संबंध होते आणि ते दोघे एकत्र राहत होते. आता त्यांचे संबंध बिघडले आहेत. पण या प्रकरणामध्ये आयपीसी कलम 376 (2) (N) अंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही. असं सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.’ राजस्थान हायकोर्टाने आयपीसी कलम 438 नुसार अटकपूर्व जामीनासाठी आरोपीचा अर्ज फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

राजस्थान हायकोर्टाने आरोपीला 19 मे रोजीच्या अटकेच्या आदेशावर जामीन देण्यास नकार दिला होता. याचिकाकर्त्याने तक्रारदार महिलेसोबत लग्न करण्याचा विश्वास देऊन संबंध ठेवले. या संबंधांमुळे एका मुलीचा जन्म झाला. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य पाहता याचिकाकर्त्याचा जामीन फेटाळण्यात आला. असं यावेळी हायकोर्टानं म्हटलं होतं.

दरम्यान, यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर सुनावणी देत राजस्थान हायकोर्टाचा आदेश रद्द केला आहे.
ज्यात आरोपीचा जामीन फेटाळण्यात आला होता. अपीलकर्त्याला सक्षम अधिकार देण्यासाठी जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. असं खंडपीठाने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.